Mumbai-Pune Expressway Traffic jam : द्रुतगतीवरील कोंडी धोक्याची घंटा, महामार्गावर आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी; यंत्रणांतील मर्यादा उघड

Mumbai Pune Expressway gas tanker accident traffic jam : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर अपघातामुळे ३३ तासांची वाहतूक कोंडी झाली. प्रशासनाची आपत्कालीन तयारी, पर्यायी मार्ग, प्रशिक्षण व प्रभावी संदेशवहनाची गरज या घटनेतून स्पष्ट झाली.
Mumbai-Pune Expressway Traffic jam

Mumbai-Pune Expressway Traffic jam

sakal

Updated on

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ टँकर अपघातात झालेली वायू गळती आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी झालेली दिरंगाई, पर्यायाने झालेली वाहतूक कोंडी यामुळे प्रशासनाच्या अनेक मर्यादा उघड झाल्या आहेत.

महामार्गावर झालेली ३३ तासांची कोंडी ही केवळ एक तांत्रिक अडचण नसून, ती एक गंभीर धोक्याची घंटा मानली जात आहे. गॅस टँकरसारखी स्फोटक वाहने जेव्हा प्रमुख मार्गावर उलटतात, तेव्हा प्रशासन आणि नागरिक या दोघांच्याही आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी लागते. अशा परिस्थितीत संयम आणि पूर्वतयारीच आपल्याला वाचवू शकते, यासाठी नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे, असे नागरिक सांगत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com