
pune crime news
esakal
पुणे आता क्राइम नगरीच्या दिशेने वाटचाल करत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यातील गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. गोळीबार, कोयता गँग, महिलांवरील अत्याचार, या प्रत्येक घटनेत वाढ होत आहे. आयुष कोमकर हत्याकांडानंतर पुण्यात गाडीला साईड न दिल्याच्या कारणावरून घायवळ गँगने थेट गोळीबार केला होता. त्यांच्यावर कारवाई सुरू असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.