Pune : मुंबई-पुणे रेल्वेसेवा एक डिसेंबरपासून सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

railway
मुंबई-पुणे रेल्वेसेवा एक डिसेंबरपासून सुरू

मुंबई-पुणे रेल्वेसेवा एक डिसेंबरपासून सुरू

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरताच रेल्वे गाड्यांची सेवा पूर्ववत केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई-पुणे आणि मुंबई-चेन्नई या दोन रेल्वे गाड्यांची सेवा एक डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पुणे रेल्वे विभागाने सांगितले.

प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून कोरोनामुळे थांबविलेल्या रेल्वे गाड्या टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयातूनच मध्य रेल्वेने मुंबई-पुणे आणि मुंबई-चेन्नई दरम्यानची रेल्वेसेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला. तिकीट आरक्षित असेल तरच, या मार्गावर प्रवास करता येणार आहे. या मार्गासाठी साध्या तिकिटांची विक्री केली जाणार नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करणे सक्तीचे आहे, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.

  1. अशा धावणार गाड्या
    मुंबई-पुणे (इंटरसिटी एक्स्प्रेस, १२१२७)- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज सकाळी ०६.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी सकाळी ९.५७ वाजता पोचेल.


  2. पुणे-मुबई (इंटरसिटी एक्स्प्रेस, १२१२८)- पुणे येथून दररोज संध्याकाळी ५.५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ९.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोचेल.


  3. मुंबई-चेन्नई (अतिजलद, २२१५७)- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी रात्री १०.५५ वाजता सुटेल आणि चेन्नई एग्मोर येथे दुसऱ्या दिवशी रात्री १०.१५ वाजता पोचेल.


  4. चेन्नई-मुंबई (अतिजलद, २२१५८) ४ डिसेंबरपासून चेन्नई एग्मोर येथून दर गुरुवार, शनिवार आणि सोमवारी सकाळी ६.२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ५.५० वाजता पोचेल.

loading image
go to top