

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेले डॉ. दीपक पोखरकर व अन्य स्वयंसेवक
Sakal
मंचर : मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) स्वयंसेवकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली. ‘वर्ल्ड यूथ पार्लमेंट २०२६’ या प्रतिष्ठित परिषदेत देशातील २३ राज्यांसह २८ देशांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.त्यात महाराष्ट्रातील सहा विद्यार्थ्यांसह एका कार्यक्रम अधिकाऱ्याची कामगिरी लक्ष वेधक ठरली असून मुंबई विद्यापीठाच्या पथकाचे नेतृत्व डॉ. दीपक दादाभाऊ पोखरकर (रा. खडकी पिंपळगाव, ता. आंबेगाव) यांनी केले.