Nala Overflowing with Garbage in Mundhwa : मुंढवा येथील बधे वस्तीतील नाल्यात नियमित स्वच्छता न झाल्याने गेल्या महिन्याभरापासून कचरा साचून नाला तुंबला आहे, परिणामी दुर्गंधीमुळे पादचारी व पीएमपी बसथांब्यावरील प्रवाशांना प्रचंड त्रास होत असून, महापालिका या तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहे.
मुंढवा : येथील बधे वस्तीतील नाल्यात कचरा टाकला जात आहे. नाल्याची नियमित स्वच्छता न केल्यामुळे गेल्या महिनाभरापासून कचरा साचला आहे. त्यामुळे नाला तुंबल्याने पाण्यात कचरा कुजून दुर्गंधी सुटली आहे.