

Mundhwa land Case
esakal
Pune Latest News: मुंढवा येथील शासकीय जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात मुख्य संशयित आरोपी शीतल तेजवानी हिला बुधवारी (ता. ३) अटक करण्यात आली. तेजवानीला उद्या गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मुंढवा येथील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या मालकीची सुमारे ४० एकर शासकीय जमीन तब्बल तीनशे कोटी रुपयांना विक्रीस काढल्याचा धक्कादायक प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. या व्यवहारात अमेडिया एंटरप्राइझेस कंपनीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार भागीदार आहेत. अमेडिया कंपनी आणि जमीन धारक शितल तेजवानी यांच्यात व्यवहार झाल्याचे समोर आले. या दस्तऐवज प्रक्रियेत अनेक नियमांना बगल देण्यात आल्याचा संशय आहे.