
मुंढवा : खराडी-केशवनगरला जोडणाऱ्या पुलाचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरूच आहे. जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले असून, बाकी २० टक्के रखडले आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे थांबलेल्या कामाचा नाहक त्रास मुंढवा, केशवनगरकरांना सहन करावा लागत आहे. पुलासाठी नागरिकांच्या करातून कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या पुलामुळे गैरसोय टळण्यापेक्षा सततच्या वाहतूक कोंडीने डोकेदुखी मात्र वाढली आहे. महापालिका आयुक्तांनी यात लक्ष घालून पुलाचे काम लवकर पूर्ण करून घेण्याची मागणी होत आहे.