अंमली पदार्थप्रकरणी दिल्लीत छापेसत्र

अंमली पदार्थप्रकरणी दिल्लीत छापेसत्र
Published on

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.२४ ः गुजरातमधील मुंदरा बंदरावर २०२१ मध्ये तब्बल २१ हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडले होते. यासंदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज दिल्लीतील प्रसिद्ध नाईट क्लब संचालक हरप्रीतसिंह तलवार याच्या जागेसह अन्यत्र छापे घातले. अंमली पदार्थाची संबंधित हवाला प्रकरणी हे छापे घालण्यात आले.
अंमली पदार्थांच्या प्रकरणात कबीर तलवार नावाच्या व्यक्तीस २०२२ मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली होती. सध्या हा आरोपी जामिनावर बाहेर आहे. मुंदरा बंदरात सप्टेंबर २०२१ मध्ये २१ हजार कोटी रुपये किंमतीचे अफगाणी हेरॉईन जप्त करण्यात आले होते. ‘ईडी’, महसूल गुप्तचर संचालनालयासह इतर तपास संस्थांनी ही कारवाई केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com