Coronavirus: कोरोनाबाधित वाढताहेत, घराबाहेर पडू नका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने नागरिकांनी घरी राहून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन महसूल,महापालिका आणि पोलिस प्रशासनाने केले आहे

पुणे - पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने नागरिकांनी घरी राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महसूल, महापालिका आणि पोलिस प्रशासनाने केले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे स्मार्ट सिटी कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटरला सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भेट दिली. या वेळी पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त व पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपायुक्त राजेंद्र मुठे आदी अधिकारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी राम म्हणाले, ""नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने प्रशासन योग्य पावले उचलत आहे. मात्र, अत्यावश्‍यक सेवा-सुविधा पुरवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये.'' 

Coronavirus:स्थानिक संपर्कातून सर्वाधिक रुग्ण; पुण्यात कोरोनाचे 142 पैकी 122 रुग्ण परदेश दौरा न केलेले

डॉ. के. वेंकटेशम यांनी लॉकडाऊनच्या परिस्थितीत पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. 

एकात्मिक डॅशबोर्ड विकसित 
पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने एकात्मिक डॅशबोर्ड विकसित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत दैनंदिन माहिती अद्ययावत आणि मॅपिंग करण्यात येत असून, त्याचा प्रशासकीय निर्णय घेण्यात महत्त्वपूर्ण उपयोग होत असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal and police administration appeal citizens to stay home