पुणे शहर होणार मुंबई शहरापेक्षा मोठे; कसे ते वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

महापालिकेची निवडणूक चौदा महिन्यांवर आली असताना २४ नोव्हेंबरला राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने पुणे महापालिकेत नव्याने २३ गावांचा समावेश करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती व अभिप्राय मागितली आहे. त्यामुळे २३ गावांच्या महापालिकेत समावेशाच्या हालचालींना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. ही गावे समाविष्ट झाल्यानंतर पुणे महापालिकेची हद्द मुंबई महापालिकेपेक्षा मोठी होणार आहे.

खडकवासला - महापालिकेची निवडणूक चौदा महिन्यांवर आली असताना २४ नोव्हेंबरला राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने पुणे महापालिकेत नव्याने २३ गावांचा समावेश करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती व अभिप्राय मागितली आहे. त्यामुळे २३ गावांच्या महापालिकेत समावेशाच्या हालचालींना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. ही गावे समाविष्ट झाल्यानंतर पुणे महापालिकेची हद्द मुंबई महापालिकेपेक्षा मोठी होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महापालिकेतील समावेशाबाबत एक जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्या वेळी उर्वरित गावे टप्प्याटप्प्याने महापालिकेत समाविष्ट केली जातील, असे राज्य सरकारने स्पष्ट केले होते. त्याला अनुसरून समाविष्ट करायच्या गावांचा तपशील तसेच पुणे शहराची सुधारित हद्द याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी अभिप्रायासह शासनास तातडीने सादर करावी, असा आदेश नगरविकास विभागाने दिला आहे. तसेच मंतरवाडी गावाच्या समावेशाची बाब तपासून पहावी, असेही आदेशात म्हटले आहे.

...तर बांधकाम व्यावसायिक देशाधडीला लागतील; ग्राहकांनाही बसेल आर्थिक फटका

समाविष्ट होणारी गावे
म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, न्यू कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, मंतरवाडी, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, वाघोली

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal area city of Pune will be bigger than the city of Mumbai