esakal | महत्त्वाची बातमी : लॉकडाउनमध्येही पुणेकरांना दररोज मिळणार वृत्तपत्र!
sakal

बोलून बातमी शोधा

Newspaper-Distribution

लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र आणि राज्य सरकारांनी काही सवलती जाहीर करीत, व्यवहार सुरू केले आहेत.

महत्त्वाची बातमी : लॉकडाउनमध्येही पुणेकरांना दररोज मिळणार वृत्तपत्र!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : वृत्तपत्रामुळे कोरोनाचा संसर्ग होतो, या गैरसमजुतीतून संपूर्ण शहरात वर्तमानपत्र वितरणावर घातलेली बंदी सोमवारी (ता.४) मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना रोज वृत्तपत्र मिळणार आहे. वृत्तपत्र वितरणाला परवानगी आहे, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, 'कंटेन्मेंट झोन' वगळता उर्वरित शहरात वृत्रपत्रे उपलब्ध होणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या काही दिवसांपासून वृत्तपत्र हाताळल्याने कोरोनाची लागण होत असल्याची अफवा पसरविण्यात आली होती. मुळात, तशी वस्तुस्थिती नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. वृत्तपत्रामुळे कोरोना होत नसल्याचा खुलासाही संशोधकांनी केला आहे. मात्र. त्यानंतर कोरोना रोखण्याच्या उपायांचा भाग म्हणून त्याचे वितरण बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केले. त्यानंतर पुण्यासह अन्य शहरांमध्ये वृत्तपत्र वितरण थांबविण्यात आले.

- पुणे : केवढी ही गर्दी! वारजे पुलाखाली जमले परप्रांतीय मजूर; मग पोलिसांनी...

मात्र, लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र आणि राज्य सरकारांनी काही सवलती जाहीर करीत, व्यवहार सुरू केले आहेत. तेव्हा, वृत्तपत्र वितरणामुळे कोरोना होत नसल्याची सांगत, त्याचे वितरण करण्यास हकरत नाही, असे आवर्जून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेले वर्तमानपत्राचे वितरण आता सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

- Big Breaking : 'यूपीएससी' परीक्षेबाबत मोठा निर्णय; लॉकडाउनमुळे परीक्षा...!

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, ''लॉकडाउनमध्ये शिथिलता आणल्याने रोजचे काही व्यवहार पूर्वपदावर येणार आहेत. त्यात वृत्तपत्र वितरणही करता येणार आहे. अन्य दुकाने आणि आस्थापने सुरू करतानात वर्तमानपत्रे सुरू करण्यात परवानगी आहे. परंतु, सध्या शहराच्या 97 टक्के भागांतच वर्तमानपत्र वितरण करता येणार असून, उर्वरित 3 टक्के भाग हा कंटेन्मेंट झोन आहे. त्याठिकाणी शंभर टक्के लॉकडाउन असेल.''

आणखी वाचा - घसा ओला करण्यासाठी तळीरामांची झुंबड, लॉकडाऊनचा फज्जा

loading image