
Pune Municipal Corporation
पुणे - शहरात अनधिकृत फ्लेक्स लावून आगामी निवडणुकीसाठी स्वतःची जाहिरात करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना ही चूक महागात पडणार आहे. उमेदवारी अर्ज भरताना फ्लेक्सचा दंड भरला की नाही हे तपासले जाणार आहे. याचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्यास अर्ज बाद होऊ शकतो. फ्लेक्सबाजी थांबविण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेतला आहे.