encroachment crime in manjari
sakal
हडपसर - महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन व बांधकाम विभागाने संयुक्तपणे मांजरी फाटा ते मांजरी गाव अशी अतिक्रमण विरोधी कारवाई केली. मात्र, ही कारवाई आवश्यक तेथे न झाल्याने ती केवळ फार्स ठरली असून, अतिक्रमण निर्मूलन विभागाची ही कृती म्हणजे 'आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी' अशी झाली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.