

Pune Municipal Corporation
Sakal
पुणे - पुणे महापालिकेच्या हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील शेवाळेवाडी आणि मांजरी परिसरातील मलनिस्सारण व देखभाल दुरुस्ती कामांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने संबंधित शाखा अभियंता आकाश ढेंगे यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्यांची खातेनिहाय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिले आहेत. यापूर्वी टीडीआर प्रकरणात दोन अभियंत्यांचे निलंबन झाले आहे.