Pune News : महापालिकेकडुन करवाढीत दिलासा! पण पाणीपट्टी बिलाद्वारे पुणेकरांच्या खिशाला कात्री

पुणे महापालिका प्रशासनाने मंगळवारी सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये करवाढ न करता पुणेकरांना एकीकडे दिलासा दिला.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal
Updated on

पुणे - महापालिका प्रशासनाने मंगळवारी सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये करवाढ न करता पुणेकरांना एकीकडे दिलासा दिला. त्याचवेळी यंदाच्या आर्थिक वर्षापासुन मीटरप्रमाणे पाणी वापराचे बिल भरण्याची व्यवस्था मात्र केली. त्यामुळे नागरीकांना आता वीज बिलाप्रमाणेच पाणीपट्टी बिलासासाठीही खिशाला कात्री लागणार आहे.

महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी महापालिकेचे २०२५-२६ या वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. डॉ. भोसले यांनी तब्बल १२ हजार ६१८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करून त्यास मंजुरी दिली.

त्यावेळी त्यांनी करवाढीसंदर्भात कोणताही प्रस्ताव नसल्याचे आणि हे अंदाजपत्रक सर्वसामान्य नागरीकांसाठी आहे. या अंदाजपत्रकामध्ये पाणी पुरवठा, रस्ते सुधारणा व आरोग्य सेवेसाठी मोठी तरतूद केल्याचेही सांगितले. त्यामुळे नागरीकांना चांगलाच दिलासा मिळण्याची चिन्हे होती.

दरम्यान, महापालिका आयुक्तांनी समान पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या सद्यःस्थितीची माहिती देऊन पाणी मीटर प्रणाली सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.मीटरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्याची दरवर्षी अंदाजे १२५ कोटी रुपये जमा होतात.

२०२३-२४ या आर्थिक वर्षात १३० कोटी ९८ लाख रुपये, तर २०२४-२५ मध्ये ३१ जानेवारी अखेरपर्यंत १०२ कोटी ४५ लाख रुपये जमा झाले आहेत. ३१ जानेवारी अखेरपर्यंत शहरात ४७ हजार ७० इतके नळजोडची संख्या आहे. तर ७२७ कोटी ९६ लाख रुपये थकबाकी आहे. दुबार पाणीपट्टी, नादुरुस्ती मीटर, नळजोड बंद, घोषीत झोपडपट्टीमधील पाणीपट्टी अशा विविध कारणांमुळे मीटर पाणीपट्टीची थकबाकी आहे.

पाणी मीटर बसविण्याची जबाबदारी संबंधित ग्राहकांचीच असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. नादुरुस्तीच्या काळात सरासरी वापरापेक्षा जादा वापर गृहीत थरुण बिल आकारणी केली जाते. मीटर दुरुस्त केल्यानंतर वसुली होणारी रक्कम ही २० ते २५ टक्के इतकी आहे. ही थकबाकी वसुली करण्याचे काम महापालिकेकडुन सुरु असल्याचे अंदाजपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेकडुन पाणीपट्टी थकबाकी वसुलीवर भर

नागरीकांकडे मोठ्या प्रमाणात असलेली थकबाकी वसुल करण्यासाठी महापालिकेकडुन विविध प्रयत्न सुरु आहे. महापालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात तीन वेळा लोक अदालत भरविली. त्याद्वारे एक कोटी १३ लाख रुपये इतकी थकबाकी वसुल करण्यात आली असल्याचे महापालिकेने अंदाजपत्रकात म्हंटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com