

Pune Municipal Corporation
Sakal
पुणे - वारजे येथे निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण केल्याचे नागरिकांनी समोर आणून त्याचे व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाले होते. या प्रकरणी ठेकेदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर पथ विभागाच्या दोन अभियंत्यांनी त्यांच्या कामात निष्काळजीपणा केल्याचे चांगलेच भोवबे असून, त्यांना निलंबित केले आहे. त्यामुळे थातूरमातूर काम करणाऱ्यांना चांगलाच झटका बसला आहे.