Pune Voter List : प्रशासनाला करावी लागणार मतदारयादीत सुधारणा; निवडणूक आयोगाचे आदेश!

Election Commission Orders : पुणे महापालिकेच्या प्रारूप मतदारयादीत मोठ्या प्रमाणात झालेल्या चुका समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाने आयुक्तांना स्वतःहून तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. चुकीच्या प्रभागात गेलेल्या मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करून योग्य नोंदी करण्याची जबाबदारी प्रशासनावर टाकण्यात आली आहे.
The Election Commission has directed the PMC Commissioner to personally review and correct widespread errors in the voter list

The Election Commission has directed the PMC Commissioner to personally review and correct widespread errors in the voter list

Sakal

Updated on

पुणे : महापालिका निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या मतदार यादीत दुबार नावे, मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात जाणे, बाहेरील मतदारांचा चुकीचा समावेश अशा गंभीर चुका मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. या गोंधळामुळे नागरिकांसह सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारींचा पाऊस पाडला. त्यामुळे प्रशासनाची फजिती होत असल्याने महापालिका आयुक्तांनीच स्वतः पुढाकार घेऊन या मतदार याद्या तपासून घ्‍याव्यात असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यासंदर्भात पुणे महापालिकेने तयारी सुरू केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com