जायका प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महापालिका स्वतंत्र कक्ष सुरू करणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

निविदा मागवूनही त्यावर बसून राहिलेल्या महापालिका प्रशासनाला आता कुठे जाग आली आहे. जायका प्रकल्पाची अंमलबजावणी गतीने करण्यासाठी येत्या एक ऑक्‍टोंबर पासून महापालिकेत "स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष' स्थापन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या कामावर देखरेख केली जाणार आहे.

पुणे - निविदा मागवूनही त्यावर बसून राहिलेल्या महापालिका प्रशासनाला आता कुठे जाग आली आहे. जायका प्रकल्पाची अंमलबजावणी गतीने करण्यासाठी येत्या एक ऑक्‍टोंबर पासून महापालिकेत "स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष' स्थापन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या कामावर देखरेख केली जाणार आहे.

पुण्यात महामेट्रोला मोठा ब्रेक थ्रू; 1600 मीटरचा बोगदा पूर्ण

पुणे शहरातील मुठा नदीचे प्रदूषण कमी करणे आणि शहरात निर्माण होणाऱ्या शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रि या करण्यासाठी महापालिकेने एक हजार कोटी रुपयांचा जायका प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी केंद्र सरकार आणि जायका यांच्याकडून महापालिकेला जवळपास 840 कोटी रुपयांचा अनुदान मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत शहरात अकरा ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेकडून वर्षभरापूर्वीच निविदा काढण्यात आल्या होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

परंतु त्या जादा दराने आल्याचा कांगावा करीत महापालिकेने त्यावर निर्णय घेण्यास टाळाटाळ केली. तसेच जायकाबरोबरच झालेल्या करारातील अनेक अटींचे पालन केले नसल्याचे उघडकीस आले होते. केंद्र सरकार आणि जायकाने त्यावरून फटकारल्यानंतर महापालिकेने पत्र पाठवून झालेल्या चुकीची कबुली दिली. तसेच या प्रकल्पाची अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून कालबद्ध पद्धतीने त्यांची अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासन केंद्र आणि जायकाला दिले होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्या पार्श्‍वभूमीवर आता एक ऑक्‍टोबरपासून महापालिकेत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले,"" हा प्रकल्प शहरासाठी गरजेचा आहे. त्यांचे नियोजन करून तो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हा कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.''

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation will start a separate cell to facilitate Jaika project