Neelam gorhe
sakal
पुणे - शहर भयमुक्त करून सर्वसामान्यांच्या विकासाचा ‘धनुष्यबाण’ महापालिकेत नेण्याचा निर्धार शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित विविध जाहीर सभांमध्ये बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी घराणेशाही आणि भ्रष्ट मांडवलीच्या राजकारणावर जोरदार प्रहार केला. कोणत्याही दबावाला बळी न पडता शिवसेना उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.