कात्रज घाटातील कचरा घेण्यास महापालिकेच्या घनकचरा विभागाचा नकार

Municipal Solid Waste Department refuses to take waste from Katraj Ghat
Municipal Solid Waste Department refuses to take waste from Katraj Ghat

कात्रज : पुण्याचे दक्षिण प्रवेशद्वार असलेल्या कात्रज घाटातील कचरा समस्या गंभीर बनली होती. त्यानंतर सकाळमधून सातत्याने बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर भिलारेवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांच्या हद्दीतील तर मांगडेवाडीतील मेरिटेक ऑटोमोबाईल्स या खाजगी कंपनीकडून परिसरातील कचरा साफ करण्यात येणार होता. कंपनीने याबाबत कामाला सुरुवात करत मोठ्या प्रमाणात कचरा साफ केलादेखिल होता. पंरतु, कात्रज घाटातील कचरा घेण्यास महापालिकेच्या घनकचरा विभागाने नकार दिला आहे.मांगडेवाडी पेट्रोल पंपापासून ते कात्रज बोगद्यापर्यंतचा कचरा साफ करण्याचे मेरिटेक ऑटोमोबाईल्स या खाजगी कंपनीचे नियोजन होते.

कचरा साफ करताना त्यांनी काही कामगारांच्या मदतीने कचरा गोळा करून तो वाहनांद्वारे कात्रज येथिल कचरा डेपोवर घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या परवानगीने आणून खाली करण्यास सुरुवात केली होती. परंतु, पालिकेच्या मुख्य विभागातील अधिकाऱ्यांकडून महापालिकेच्या हद्दीबाहेरील कचरा घेता येणार नाही. हे नियमबाह्य असल्याचे सांगत कचरा खाली करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे हा कचरा कुठे खाली करायचा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे कचरा साफ करण्याचे काम थांबले असून कात्रज घाटात पुन्हा कचऱ्याचे साम्राज्या वाढण्याची शक्यता आहे.

पुण्यात नागरिकांच्या विरोधामुळे एक कोविड सेंटर बंद

मेरिटेक ऑटोमोबाईल्स कंपनीने पहिल्या १० ते १५ दिवसांत मोठ्या प्रमाणात कचरा साफ केला होता. काही ठिकाणी कचरा साफ करुन कचऱ्याचे ढीग लावण्यात आल्याचे कात्रज घाटात दिसून येत आहे. यापैकी बराच कचरा हा कात्रजमधील कचरा प्रकल्पावर आणला गेला. हे काम सुरळित चालू होते. परंतु, महापालिकेच्या घनकचरा विभागाने परवानगी नाकारल्याने पर्यावरणप्रेमींकडूनही नाराजी व्यक्त होत असून कात्रज घाटातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा विभागाने सहकार्य करण्याची मागणी जोर धरत आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''कात्रज घाटातील कचरा साफ करण्याच्या कामास सुरुवात करून मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली होती. परंतु, कचरा प्रकल्पावर महापालिकेने कचरा घेण्यास नकार दिल्याने कचरा कुठे टाकायचा हा प्रमुख प्रश्न उपस्थित झाल्याने पुन्हा हे काम थांबले आहे.''
- सोहम खानापुरे, बिजनेस डेव्हलपमेंट हेड, मेरिटेक

''महापालिकेबाहेरील कचरा महापालिकेच्या हद्दीत आणून प्रोसेसिंग करणे शक्य नाही. हे नियमबाह्य असल्याने कात्रज घाटातील कचरा आम्हाला घेता येणार नाही.''
- अजित देशमुख, उपायुक्त, घनकचरा विभाग महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com