esakal | शिवणेतील दांगट पाटील नगर येथे अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा.
sakal

बोलून बातमी शोधा

pune

शिवणेतील दांगट पाटील नगर येथे अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा.

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वारजे : शिवणे येथील दांगट पाटील नगर येथील सर्व्हे नं. 85 मध्ये अनधिकृत बांधकामावर पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून शुक्रवारी मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये वीस हजार स्के.फूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.

पुणे महापालिकेत शिवणे गाव येऊन अनेक वर्षे झाली तरी अनेक नागरिकांकडून महापालिकेच्या नियम व अटीकडे दुर्लक्ष करून टोलेजंग इमारती उभारल्या जात आहे. अशा अनधिकृत बांधकामांवर सध्या पुणे महानगरपालिके कडून कारवाई केली जात आहे.

हेही वाचा: पक्ष्यांनी सोडली अर्धवट घरटी अन् वाळू लागले वृक्ष

पालिकेच्या बांधकाम विभागा कडून नोटीस ही देण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी जॉब कटरच्या व जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत इमारतीचे बांधकाम तोडण्यात आले.

सदर कारवाई बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाभियंता देवेंद्र पात्रे, जयवंत पवार, कनिष्ठ अभियंता सतीश शिंदे, संदेश कुळवमोडे, गंगाप्रसाद दंडीने, संग्राम पाटील, सचिन जावळकर, अजित ववले यांच्या उपस्तित एक जॉब कटर, तीन जेसेबी व 170 पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

कारवाईची कुणकुण स्थानिक नागरिकांना लागली तेव्हा अनेक पुढारी व स्थानिक नागरिक अतिक्रमण कारवाईला विरोध म्हणून तीन तास रस्त्यावर बसले. इमारत बांधल्या नंतरच तसेच कोणतीही नोटीस न देता आमच्यावर कारवाई केली जाते असा आरोप यावेळी करण्यात आला. मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने तीन तासानंतर कारवाईला सुरुवात होऊन अनेक इमारतीवर कारवाई करण्यात आली.

loading image
go to top