esakal | पक्ष्यांनी घरटीही सोडली अर्धवट! पावसाने उत्तर महाराष्ट्राची चिंता वाढवली
sakal

बोलून बातमी शोधा

gangapur dam

पक्ष्यांनी सोडली अर्धवट घरटी अन् वाळू लागले वृक्ष

sakal_logo
By
महेंद्र महाजन


नाशिक :
पावसाने उत्तर महाराष्ट्राची चिंता अधिक वाढवली आहे. जायकवाडी धरण ४३.६७ टक्के भरले असून, उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या, मध्यम अन लघु ५७१ धरणांमध्ये आतापर्यंत ५१.१ टक्के जलसाठा झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या सुरवातीला ७५.६४ टक्के धरणे भरली होती. अशातच, पक्ष्यांनी घरटी अर्धवट सोडली आहेत. तसेच २००२ प्रमाणे झाडे वाळू लागली आहेत.


हवामानशास्त्र अभ्यासकांनी ६ ते ११ सप्टेंबर आणि १५ ते २५ सप्टेंबरसह १३ ते १८ ऑक्टोबरमधील परतीचा असा एकूण ३०० मिलिमीटर पाऊस राज्यभर होण्याची शक्यता वर्तवली आहे. पुणे हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी (ता. ३) काही ठिकाणी, तर शनिवारी (ता. ४) तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रविवारी (ता. ५) आणि सोमवारी (ता. ६) बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत गेल्या वर्षीइतका १०४.५ टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील मोठी, मध्यम आणि लघु अशी एकूण तीन हजार २६७ धरणे ६१.५५ टक्के भरली आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या सुरवातीला या धरणांमध्ये ७८.०७ टक्के जलसाठा झाला होता. हवामानशास्त्र अभ्यासकांच्या शक्यतेचा विचार करता, येत्या तीन टप्प्यांतील पावसामध्ये धरणे भरण्यास मदत होईल. तरीही मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील धरणांमध्ये जलसाठा पुरेसा होणार काय? याबद्दलचे प्रश्‍नचिन्ह सद्यःस्थितीत कायम आहे.

हेही वाचा: २७ हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकासह दोघांना अटक


नाशिक जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये आतापर्यंत ६६ टक्के जलसाठा झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये ९१ टक्के जलसाठा कायम राहिला आहे. पालखेड ८५, वाघाड ७३, दारणा ९१, कडवा ९३, चणकापूर ८६, केळझर ९०, पुनंद ९१ टक्के भरले आहे. मात्र इतर धरणांमधील जलसाठा खूप कमी आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या सुरवातीला धरणे ८२ टक्के भरली होती. जिल्ह्यात आतापर्यंत ७०.४८ टक्के पाऊस झाला असून, गेल्या वर्षी याच काळात ८८.०५ टक्के पाऊस झाला होता. नाशिक, पेठ, त्र्यंबकेश्‍वर, कळवण, चांदवड, सिन्नर तालुक्यांसाठी आणखी पावसाची आवश्‍यकता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील पावसाची सद्यःस्थिती
(आकडे टक्केवारीमध्ये)
जिल्हा आताचा गेल्या वर्षीचा
धुळे ९४.२ १३३.८
नंदुरबार ४२.५ ६९.९
जळगाव ८९.३ १३४
नगर १२३ १७०.८

हेही वाचा: नाशिक : जिओ मॅपिंगनुसार प्रभागांचे आराखडे तयार करण्यास सुरवात

loading image
go to top