मुंज प्रदर्शनाच्या नोंदणीस प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Munj tradition Exhibition Registration

मुंज प्रदर्शनाच्या नोंदणीस प्रतिसाद

पुणे : ‘मुंज’ या संस्काराची परंपरा, महत्त्व उलगडणारा आणि त्याच्या विविध सेवांची माहिती देणारे महाराष्ट्रातील पहिले शास्त्रोक्त प्रदर्शन ‘व्रतबंध-एक विद्याव्रत’ याच्या नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पर्णकुटी मुंज, गुरुकुल मुंज, वृंदावन मुंज, शिवशाही मुंज, पेशवाई मुंज अशा विविध प्रकारांच्या मुंजीबाबत सर्वांमध्ये प्रचंड उत्सुकता नोंदणी दरम्यान दिसून आली.

या प्रदर्शनात मुंजीच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच मुंजीच्या विविध प्रकारांबद्दल दृकश्राव्य माध्यमातून सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

तसेच या विषयातील तज्ज्ञ मान्यवरांचा परिसंवाद आयोजित केला असून त्याद्वारे या संस्काराची माहिती दिली जाणार आहे. ‘पाटणकर इव्हेंट्स’ने आयोजित केलेल्या या सोहळ्याचे ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक आहे. या प्रदर्शनास अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

  • कुठे ः सिद्धी बेंक्वेट हॉल, डीपी रोड, एरंडवणे, पुणे

  • कधी ः ४ आणि ५ नोव्हेंबर

  • मुंजीचे देखावे, रुखवत व पेहराव प्रदर्शन वेळ ः सकाळी १०.३० ते ८ (दोन्ही दिवस)

  • मुंजीच्या संस्कारांचे नाट्यपूर्ण सादरीकरण आणि परिसंवाद ६ ते ७ (ता. ५ नोव्हेंबर)

  • ‘व्रतबंध- एक विद्याव्रत’ या प्रदर्शनात सहभागासाठी शेजारील क्यूआर कोड स्कॅन करा.

अधिक माहितीसाठी संपर्क ः 8999828543