Muralidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांच्यावर धार्मिक प्रलोभने दाखवल्याचा आरोप, आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल

Ravindra Dhangekar: पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार असलेल्या मुरलीधर मोहळ यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे
Ravindra Dhangekar|Muralidhar Mohol
Ravindra Dhangekar|Muralidhar MoholEsakal

पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यंदा भाजपकडून लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा प्रचार जोरात चालू आहे. अशात, काँग्रेस पक्षाकडून त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून राम मंदिर झाले आता राष्ट्रमंदिरासाठी संकल्प करूयात" या मथळ्याखाली जाहिराती केल्या आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील राममूर्तीच्या पाया पडत आहेत असे छायाचित्र असलेली पत्रके वाटली आहेत. असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

दरम्यान या निवडणुकीत मोहोळ यांच्यासमोर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत जायंट किलर ठरलेल्या आमदार रवींद्र धंगेकर यांचे आव्हान आहे.

धंगेकर यांनी पोटनिवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर पुण्यात काँग्रेस पक्षाला मोठे बळ मिळाले आहे. त्यामुळे गेल्या दोन निवडणुकीत गमावत असलेला पुणे लोकसभा मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसने धंगेकरांना उमेदावारी दिली आहे.

तर, दुसरीकडे माजी महापौर असलेले भाजपचे मुरलीधर मोहोळही बाजी मारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. देशात व राज्यात असलेली भाजपची सत्ता ही त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत.

Ravindra Dhangekar|Muralidhar Mohol
Baramati News : बारामतीत भाजप कार्यकर्त्यांचा आणि अजित पवारांचा मिलाप अखरे फडणविसांनी घडविला

याप्रकरणी माजी आमदार मोहन जोशी व काँग्रेसचे सोशल मीडिया राज्य समन्वयक चैतन्य पुरंदरे यांनी सांगितले की, "राम मंदिराला निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवत भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी याद्वारे धार्मिक प्रलोभन दाखवत यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे."

Ravindra Dhangekar|Muralidhar Mohol
Nashik Lok Sabha Election 2024 : विचारात न घेतल्याने मनसैनिकांची घालमेल!

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पुरंदरे यांनी मोहोळ यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पुरंदरे यांची भेट घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com