Murder: ओतूर येथे ज्येष्ठ नागरिकाचा मारहाण करत गळा आवळून खून!

Murder: ओतूर येथे ज्येष्ठ नागरिकाचा मारहाण करत गळा आवळून खून!

Junnar Crime: एका ज्येष्ठ नागरिकांचा अज्ञात व्यक्तीने मारहाण करून,गळा आवळून खून झाला आहे. सदरची घटना शुक्रवारी ता.७ रोजी रात्री साडेनऊ ते शनिवारी ता.८ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सदर घटनेत नबाब अहमद शेख वय ७२,रा.ओतूर, ता.जुन्नर जि.पुणे असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.याबाबत ओतूर पोलीसात रात्री उशीरा नबाब यांचा मुलगा शादाब नबाब शेख वय ४२, मुळ रा.निमोन तास ता.संगमनेर जि.अहमदनगर सध्या.रा.वडगाव पान ता.संगमनेर जि.अहमदनगर यांने फिर्याद दिली आहे.

Murder: ओतूर येथे ज्येष्ठ नागरिकाचा मारहाण करत गळा आवळून खून!
Nashik Crime News : पिकअप मध्ये डांबून कत्तलीसाठी चाललेल्या 9 गायींची सूटका!

याबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे हे अधिक माहिती देताना म्हणाले की नबाब अहमद शेख हे ओतूर गावचे हद्दीत वडारवस्ती जवळ पानसरे यांच्या जुन्या इमारती मध्ये पश्चिम बाजुच्या एक नंबर खोलीत आपल्या भाऊ बरोबर राहत होते.

शुक्रवारी ता.७ रोजी त्यांचा भाऊ कामा निमीत्त बाहेर गावी गेला होता.शुक्रवारी रात्री साडेनऊ ते शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी कशाने तरी नबाब शेख यांच्या हनुवटीवर मारून त्यांना जखमी केले व कशाने तरी त्यांचा गळा आवळून खून केला आहे.

Murder: ओतूर येथे ज्येष्ठ नागरिकाचा मारहाण करत गळा आवळून खून!
Crime News: पोलिसांची मोठी कारवाई, पाच लुटारुंना काही तासातच केले जेरबंद!

सदर घटने नंतर अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व जुन्नर उपविभागीय अधिकारी रविंद्र चौधर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासा बाबत ओतूर पोलीसांना सुचना दिल्या.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे करत आहे.

Murder: ओतूर येथे ज्येष्ठ नागरिकाचा मारहाण करत गळा आवळून खून!
Mumbai Crime News : आईच्या कुशीतून सहा महिन्यांच्या चिमुरड्याचं अपहरण; पोलिसांकडून १२ तासात मुलाची सुखरूप सुटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com