
रामटेकडी येथे पूर्व वैमनस्यातून एका गुन्हेगारावर सहा जणांनी कोयता व तलवारीने मारहाण करून खून केल्याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मित्रांसोबत गप्पा मारत असताना त्याच्यावर ६ जणांनी सपासप तलवारीने वार केले अन्...
हडपसर (पुणे) : रामटेकडी येथे पूर्व वैमनस्यातून एका गुन्हेगारावर सहा जणांनी कोयता व तलवारीने मारहाण करून खून केल्याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. या घटनेनंतर रामटेकडी येथे तणावाचे वातावरण आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पैतरसिंग टाक (वय १९, रा. रामटेकडी ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर याप्रकरणी विकिसिंग डॅडीसिंग कल्याणी ( वय २०), विकिसंग जालींदरसिंग कल्याणी (वय १९), हुकुमसिंग डॅडीसिंग कल्याणी (वय १९), रविसिंग डॅडीसिंग कल्याणी (वय २०), मख्नसिंग अजितसिंग कल्याणी (वय २०), सुरज पाटील (वय २०) अशी खून केलेल्या ६ आरोपींची नावे आहेत. वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरोपी घरफोडी व शरिराविरूध्दच्या गुन्ह्यात जेलमध्ये होते. मात्र कोरोनामुळे ते पॅरोलवर सुटले होते. त्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पैतरसिंग आपल्या मित्रांसोबत रामटेकडी येथे गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी आरोपींनी धारदार शस्त्राने पैतरसिंगवर वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पैतरसिंगचे निधन झाले. पैतरसिंगवर घरफोडी व शरिराविरूध्दचे ५० गुन्हे दाखल आहेत. तर आरोपींवर देखील घरफोडी व शरिराविरूध्दचे गुन्हे दाखल आहेत.
Web Title: Murder Criminal Ramtekdi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..