पुणे : महिलांची छेडछाडीबाबत विचारला होता जाब; एकाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज आबासाहेब थोरात (वय ५०) यांचा येथील पारधी समाजातील एकाने तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करत खून करण्यात आला.

डोर्लेवाडी : महिलांची छेडछाड का काढतो, याचा जाब विचारल्याच्या रागातून सोनगाव (ता.बारामती) ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज आबासाहेब थोरात (वय ५०) यांचा येथील पारधी समाजातील एकाने तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करत खून करण्यात आला. येथील सोनेश्वर मंदिर परिसरात बुधवारी (ता.15) रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रत्यक्षदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार आज मकरसंक्रांतीच्या निमित्ताने गावातील महिला सोनेश्वर मंदिरात ओवासण्यासाठी जमा झाल्या होत्या. यावेळी तेथे काही तरुण उभे होते, त्यापैकी एकजण महिलांची छेडछाड करत होता. सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज त्याठिकाणी होते. त्यांनी हे दृष्य पाहिल्यानंतर त्याला याचा जाब विचारला. त्यावरून चिडून जावून त्याने त्यांच्यावर सपासप वार केले. त्यात थोरात हे जागीच ठार झाले.

दरम्यान या घटनेनंतर गावातील वातावरण तणावपूर्ण झाले असून, थोरात यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर त्याठिकाणी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु आहे. 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder in Dorlewadi Pune