मिल बैठे तीन यार...दोघांनी केला एकाचा गेम... 

murder
murder
Updated on

शिरूर (पुणे) : शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील बोलाई माता मंदिरामागील तलावात शुक्रवारी रात्री मृतावस्थेत आढळलेल्या तरूणाचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आज दोघांना अटक करण्यात आली. दारूच्या नशेत झालेल्या वादातून हा प्रकार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 

एकनाथ दत्तात्रेय जाधव (वय 37, रा. जवळे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्या खूनप्रकरणी वामन विठ्ठल खुपटे (वय 40) व रोहित ऊर्फ अप्पा शिवाजी गवळी (वय 23, दोघेही, रा. जवळे, ता. पारनेर, जि. नगर) यांना शिरूर पोलिसांनी अटक केली. तिघे एकमेकांचे मित्र आहेत. कामाच्या निमित्ताने ते शिरूर तालुक्‍यात येत. शुक्रवारी बोलाई मातेच्या मंदिरामागील मोकळ्या जागेत एकत्र बसून, ते दारू पीत असल्याचे स्थानिकांनी पाहिले होते. रात्री जाधव याचा मृतदेह मंदिराजवळील तलावात आढळला. 

जाधव हा जवळे येथील असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी तेथे जाऊन चौकशी केली असता तो खुपटे व गवळी यांच्यासोबत मलठणला गेला असल्याचे समजले. पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पोलिस पथकासह आज सकाळी जवळे येथून खुपटे व गवळी यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी जाधव याच्या खुनाची कबुली दिली. दारू पिताना भांडणे झाल्याने ठिबकच्या पाइपने त्याचा गळा आवळला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याने मृतदेह तलावात टाकला, अशी माहिती त्यांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक बी. जे. पालवे पुढील तपास करीत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com