पिंपरीत आलिशान मोटारीसाठी मित्राचाच खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

आलिशान मोटार घेण्यासाठी मित्राचे चाळीस लाखांसाठी अपहरण करून रविवारी पहाटे खून केल्याची घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात घडली.

पिंपरी - आलिशान मोटार घेण्यासाठी मित्राचे चाळीस लाखांसाठी अपहरण करून रविवारी पहाटे खून केल्याची घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात घडली. ‘खतरनाक खिलाडी २’ चित्रपट पाहून खून केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अब्दुलआहाद सयाब सिद्दीकी (वय १७, रा. दापोडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. उमर नासीर शेख (वय २१, रा. खडकी) याला अटक केली. अब्दुलआहाद याची दीड वर्षापूर्वी उमरशी मैत्री झाली होती. उमरने ‘खतरनाक खिलाडी २’ हा चित्रपट पाहून मित्राचे अपहरण करीत खंडणी घेऊन मोटार घेण्याचा प्लॅन केला. त्याने शनिवारी रात्री अब्दुलला  दुचाकीवरून विद्यापीठाच्या आवारात नेले. तेथे दोघांनी मद्यपान केले. त्यानंतर अब्दुलआहाद याचा गळा आवळून खून केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder of a friend for a luxury motor vehicle in Pimpri

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: