esakal | खळबळजनक : बारामतीत सव्वा महिन्याच्या मुलीचा पाण्याच्या टाकीत फेकून खून
sakal

बोलून बातमी शोधा

खळबळजनक : बारामतीत सव्वा महिन्याच्या मुलीचा पाण्याच्या टाकीत फेकून खून

तालुक्यातील माळेगाव येथे सव्वा महिन्यांच्या मुलीचा पाण्याच्या टाकीत फेकून खून केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी समोर आली.

खळबळजनक : बारामतीत सव्वा महिन्याच्या मुलीचा पाण्याच्या टाकीत फेकून खून

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : तालुक्यातील माळेगाव येथे सव्वा महिन्यांच्या मुलीचा पाण्याच्या टाकीत फेकून खून केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी समोर आली. हा खून नेमका कोणी व कशासाठी केला याचे कारण अस्पष्ट असून, बारामती तालुका पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश ढवण यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज दुपारी तीनच्या सुमारास माळेगाव येथील दीपाली संदीप झगडे यांच्या सव्वा महिन्यांच्या मुलीचा मृतदेह सिनटेक्सच्या पाण्याच्या टाकीत आढळल्यानंतर खळबळ माजली. या मुलीला पाण्याच्या टाकीत नेमके कोणी टाकले याचा शोध आता सुरू करण्यात आलेला आहे. दीपाली यांचे माहेर माळेगाव असून सासर काटेवाडी आहे, प्रसूतीसाठी त्या माळेगाव येथे आल्या होत्या, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

संबंधित मुलीला या घटनेनंतर तातडीने सिलव्हर ज्युबिली रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते, मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. इतक्या छोट्या बाळाचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने डॉक्टरांनीही हळहळ व्यक्त होत आहे.

ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान संध्याकाळपर्यंत यासंदर्भात गुन्हा दाखल झाला नव्हता, मात्र तालुका पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली असल्याची माहिती पुढे येत आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सव्वा महिन्याच्या मुलीला पाण्याच्या टाकीमध्ये नेमके कोणी टाकले आहे यासंदर्भात आम्ही तपास सुरू केला आहे. याबाबत जो कोणी दोषी आढळून येईल त्याच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. आम्ही यासंदर्भात तपास करीत आहोत. -महेश ढवाण, पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे.

(संपादन : सागर डी. शेलार)

loading image