बारामतीत सरपंचाच्या पतीची हत्या; गावकऱ्यांनी हल्लेखोरांची पेटवली घरं

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

डोर्लेवाडी (बारामती) : महिलांची छेडछाड का करतो याचा जाब विचारल्याच्या रागातून सोनगाव (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज आबासाहेब थोरात (वय ५०) यांचा एका व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करत खून केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोनेश्वर मंदिर परिसरात बुधवारी (ता. १५) रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, आज (ता.१५) मकर संक्रांतीच्या निमित्ताने गावातील महिला सोनेश्वर मंदिरात ओवासण्यासाठी जमा झाल्या होत्या. यावेळी तेथे काही तरुण उभे होते त्यापैकी एकजण महिलांची छेडछाड करत होता. सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज त्याठिकाणी होते. त्यांनी हे दृष्य पाहिल्यानंतर त्याला याचा जाब विचारला. त्यावरून चिडून जावून त्याने त्यांच्यावर सपासप वार केले. त्यात थोरात हे जागीच ठार झाले.

शिवेंद्रराजेंच्या फेसबुकपेजवरील पवारांचा उल्लेख बदलला

दरम्यान, या घटनेनंतर गावातील वातावरण तणावपूर्ण झाले असून गावकऱ्यांनी हल्लेखोरांची घरं पेटवली आहेत. थोरात यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर त्याठिकाणी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of Sarpanch Husbund In Baramat taluka