किरकोळ भांडण अन् 'ते' गेले जिवानिशी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

वेणुपुरी (ता. भोर) येथे किरकोळ भांडणातून ज्येष्ठ नागरिकाचा खून करण्यात आला. बाळू सावळा वेणुपुरे (वय ६५) असे खून झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे.

भोर : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात असलेल्या वेणुपुरी (ता. भोर) येथे किरकोळ भांडणातून ज्येष्ठ नागरिकाचा खून करण्यात आला. बाळू सावळा वेणुपुरे (वय ६५) असे खून झालेल्या ज्येष्ठाचे नाव असून  रविवारी (ता. १३) पहाचे दीडच्या सुमारास घटली. खून करणारा आरोपी अजित आनंदा सपकाळ यास पोलिसांनी अटक केली.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

याबाबत भोर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी (ता. १२) रात्री अकराच्या सुमारास आरोपी अजित सपकाळ याने मृत बाळू वेणुपुरे यांच्या शेजारील सोनाबाई नथूराम पारठे (वय ६७) यांच्या घराच्या दरवाजा वाजविला. त्याची विचारणा केल्यावर आरोपीने सोनाबाई यांना लाकडी फळीने मारले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला सहा टाके पडले.

याचा जाब विचारण्यासाठी मृत बाळू वेणुपुरे, गणेश मारुती वेणुपुरे, रामभाऊ रामजी वेणुपुरे, भिकू सया वेणुपुरे व लक्ष्मण ठकू वेणुपुरे आदी आरोपी अजीत यास जाब विचारायला गेले. त्यावेळी आरोपींना सर्वांना शिवीगाळ केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानंतर पहाटे दीडच्या सुमारास आरोपी अजित हा बाळू वेणुपुरे यांच्या घरी आला. दरवाजातून आवाज देवून त्यांना बाहेर बोलावले आणि लोखंडी विळ्याने त्यांच्या मानेला डाव्या बाजूने वार केला. त्यामध्ये बाळू वेणुपुरे यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संशयित आरोपीस पहाटे तीनच्या सुमारास अटक केली. गणेश वेणुपुरे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. आरोपी अजित सपकाळ हा गुन्हेगारी 
प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वी लूटमार व जनावरे चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a senior person in bhor