

Bajirao Road Murder
esakal
पुण्यात मध्यवर्ती बाजीराव रोडवर, जेथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, अशा ठिकाणी एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना दुपारच्या सुमारास घडली असता, जेव्हा रस्त्यावर अनेक जण फिरत होते, तरीही आरोपीने शस्त्राने वार केले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. मयंक खराडे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. आंबील ओढा येथे तो राहत होता, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.