पुणे: गाडीला दगड मारला म्हणून त्यानं डोक्‍यातच दगड घातला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

गुन्हे शाखेच्या युनीट पाचच्या पथकाने ठोकल्या बेड्या, कोंढवा पोलिसांकडे केले सुपूर्द 

पुणे : दुचाकीवर दगड मारला म्हणून एका नागरीकाच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा येथे घडला. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या पाच तासातच आरोपीचा शोध घेऊन त्यास बेड्या ठोकल्या. 

अतिश सुरेश वायदंडे (वय 23, रा. शिवनेरी नगर, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर ज्ञानोबा गंगाधर धनगे (वय 45, रा. कोंढवा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनीट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा खुर्द येथील दत्तात्रय पार्क पाण्याच्या टाकीजवळ पटांगणात सोमवारी मध्यरात्री सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची खबर कोंढवा पोलिसांना मिळाली होती.

INDvsAUS : ३२ वर्ष अजिंक्य ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली; भारतानं चौथ्यांदा केलाय असा पराक्रम​

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर संबंधीत व्यक्तीच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खुन झाल्याचे निष्पन्न झाले होते. कोंढवा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला. तसेच या गुन्ह्याचा शोध घेण्यास सुरूवात केली.दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनीट पाचच्या पथकाकडूनही या गुन्ह्याचा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर संबंधीत खुन हा शिवनेरी नगरमध्ये राहणाऱ्या अतिश वायदंडे याने केल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी त्यास अटक केली.

सिरमच्या लसीचा वाद कोर्टात; 'कोव्हिशिल्ड'बाबत कंपनीचे स्पष्टीकरण​

आवडत्या दुचाकीला दगड मारल्याचे सहन झाले नाही ! 
अतिश व धनगे हे एकाच परिसरात राहतात. त्यामुळे त्यांची तोंडओळख आहे. धनगे हा मुळचा परभणीतील गंगाखेडचा रहीवासी असून तो पुण्यात मोमलजुरी करून राहतो. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला मतदान करून तो दोन दिवसांपुर्वी कोंढव्यात परतला होता. धनगे यास रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना शिवीगाळ करण्याची सवय होती.

त्यानुसार, त्याने सोमवारी रात्री रस्त्याने जाताना समोर दुचाकीवर थांबलेल्या अतिशला शिवीगाळ केली. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर धनगेने अतिशला दगड मारला. तो दगड अतिशच्या दुचाकीच्या टाकीवर लागला. अतिशची होंडा शाईन ही नवीन दुचाकी असल्याने या दुचाकीवर त्याचा जास्त जीव होता. धनगेने दुचाकीला दगड मारल्यामुळे अतिशने चिडून रस्त्यावरील मोठा दगड घेऊन त्याच्या डोक्‍यात घालून त्याचा खून केला.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder by throwing a stone at one head for throwing a stone at a two wheeler