
पुणे : ‘‘थॅलेसेमिया हा रक्तविकार असलेल्या रुग्णांना सारखे रक्त भरावे लागते. त्यामुळे हा आजार त्यांच्या कुटुंबासाठी लढाई असून ती शेवटपर्यंत सुरू राहते. आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषदेच्या हद्दीमध्ये मोफत थॅलेसेमिया उपचार केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न करू,’’ अशी ग्वाही केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.