
पुणे : केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाच्या आतापर्यंतच्या एका वर्षाच्या यशस्वी कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन आणि त्यांच्या प्रकट मुलाखतीचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात शनिवारी (ता. २८) सायंकाळी सहा वाजता होणार आहे.