महत्वाची बातमी : पुण्यातील उद्यानांबाबत मोठा निर्णय?

murlidhar
murlidhar
Updated on

पुणे : कोरोना रुग्ण वाढतानाच मृत्यू कमी होत नाहीत; तेव्हा उद्याने उघडून काय साधायचे आहे? असा प्रश्‍न करीत सगळी उद्याने पुन्हा बंद करा, अशी सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. त्यामुळे 31 उद्याने पुन्हा बंद होण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे, उद्याने सुरू करण्याबाबत महापालिकेचे उद्यान खातेही फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. यांसदर्भातील निर्णय मंगळवारी होऊ शकतो. 

लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यातील नागरिकांना काही सवलती देताना विविध भागांतील 31 उद्याने सुरू करण्यात आली आहेत. त्यात प्रवेश देताना काही बंधने घातली आहेत. तरीही, नागरिकांकडून योग्य काळजी घेतली जात नसल्याचे दिसून आले आहे; तर उद्यानात येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत; आधीच अपुरे कर्मचारी असताना गरजेच्या नसलेल्या बाबींना प्राधान्य नको, अशी भूमिका घेत उद्याने बंद करण्याचा आग्रह महापौर मोहोळ यांनी धरला आहे. तसे पत्रही महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना देऊन आदेश काढण्याची मागणी महापौरांनी लावून धरली आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्यान खात्यातील अधिकाऱ्यांसह चर्चा करून मंगळवारी निर्णय घेतला जाणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महापौर मोहोळ म्हणाले, "कोरोनाला रोखण्यावर एवढ्या प्रमाणात उपाय केले जात आहेत. तेव्हा ज्या ठिकाणी थोडी फारही गर्दी होईल, ती सुरू करणे सुरक्षित नाही. उद्यानांत लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकच मोठ्या प्रमाणात येतात मात्र मुले आणि ज्येष्ठांना उद्यानात प्रवेश नाही; त्यामुळे ती सुरू करू उद्देश साध्य होणार आहे का? त्याचवेळी आरोग्य यंत्रणेशी जोडलेले उद्यान खात्याचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना मूळ काम करावे लागत आहे. त्यामुळे आरोग्य खात्याचा ताण वाढला आहे. त्यामुळे उद्याने बंद ठेवणे गरजेचे आहे.''  

पुढे ते म्हणाले, पुणेकर सुरक्षित राहातील अशाच सुविधा आता उपलब्ध करण्याची गरज आहे. नागरिकांत अजूनही भीती असताना गर्दी होणाऱ्या सुविधा का हव्यात ? त्यातून उद्याने बंद केली पाहिजेत. यासंदर्भात आयुक्त आणि उद्यान प्रमुखांशी चर्चा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Unique Tradition: 'Ek Gaon Ek Ganpati' in Ranjangaon and Surrounding Areas
Marathi News Esakal
www.esakal.com