
कोरोनामुळे निराशेचे मळभ दाटलेले आहे. त्याचा सर्वाधिक फटका सांस्कृतिक क्षेत्राला बसला. मनोरंजनाचे कार्यक्रम करणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहेत. गणेशोत्सव कोरडा गेला, नवरात्रातही कार्यक्रम नाहीत. सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले आहेत, आतातरी कोंडी फुटू दे... संगीताची ‘पहाट’ दिवाळी तरी पुन्हा उगवू दे... अशी अपेक्षा कलाकार व्यक्त करत आहेत.
पुणे - कोरोनामुळे निराशेचे मळभ दाटलेले आहे. त्याचा सर्वाधिक फटका सांस्कृतिक क्षेत्राला बसला. मनोरंजनाचे कार्यक्रम करणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहेत. गणेशोत्सव कोरडा गेला, नवरात्रातही कार्यक्रम नाहीत. सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले आहेत, आतातरी कोंडी फुटू दे... संगीताची ‘पहाट’ दिवाळी तरी पुन्हा उगवू दे... अशी अपेक्षा कलाकार व्यक्त करत आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लॉकडाउनमुळे नाट्यगृहे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांवरही बंद आहेत. कला आणि मनोरंजन क्षेत्र ठप्प आहे. दिवाळीत तरी सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळावी, यातून कलाकारांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेले कार्यक्रम पुन्हा सुरू होतील. सांगीतिक कार्यक्रम सुरू झाल्यास प्रत्येकाला कोरोनामुळे आलेले नैराश्य दूर होऊ शकेल, अशी गायक-वादक कलाकार यांची भावना आहे. यासाठी कलाकारांच्या संघटना राज्य सरकारला साकडेही घालणार आहेत.
पुण्यातील 68 वर्षीय आजोबांना नडला डेटिंगचा मोह!
शास्त्रीय गायिका सावनी शेंडे म्हणाल्या, ‘‘कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेला नाही. त्यामुळे मोठ्या संगीत महोत्सवावर मर्यादा येतीलच. मात्र, फार मोठे कार्यक्रम करण्यापेक्षा छोटेखानी कार्यक्रम करायला हरकत नाही. मात्र, रंगमंचाचे निर्जंतुकीकरण, मर्यादित रसिकांना उपस्थितीसाठी परवानगी, सुरक्षित बैठक व्यवस्था, सॅनिटाझरचा वापर सक्तीचा हवा. याबरोबरच कार्यक्रमांचे आयोजन करताना कलाकारांना मदत हा भाव हवा, ज्यांना संगीतात रस नाही, त्यांनी देखील मदतीची भावना ठेवली पाहिजे.’’
‘जंबो’नं दिलं नवं आयुष्य; रुग्णांनी व्यक्त केली कृतज्ञता
पं. यादवराज फड यांनी कलाकारांची व्यथा मांडताना सांगितले, ‘कलाकारांनी गेली सहा-सात महिने प्रचंड वाईट स्थितीचा सामना केला आहे. आता कार्यक्रम सुरू झाले नाही, तर त्याची सहनशक्ती संपेल. सध्याच्या काळात ऑनलाइन मैफली वा कार्यक्रम हे हमखास आर्थिक उत्पन्नाचे माध्यम होऊ शकत नाही. त्यामुळे छोटेखानी कार्यक्रम सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिलीच पाहिजे. आयोजनासाठी कितीही कठोर नियम लादा; पण कार्यक्रम सुरू करू द्या.
बॅंकांची कर्जवसुली थांबवली तर बॅंका तोट्यात जातील
कलाकार हा स्वाभिमानी असतो. त्याला त्याची कला सादरीकरणाची परवानगी महत्त्वाची वाटते. परंतु, कोरोनामुळे गेले सात-आठ महिने कलाकारांची स्थिती बिकट झाली आहे. म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमांना सरकारने परवानगी द्यावी. संगीतामुळे कोरोना संपणार नाही; पण या निराशेच्या वातावरणात प्रत्येकाच्या मनात फुंकर घालण्याचे काम संगीत नक्कीच करू शकेल.
- जितेंद्र भुरुक, गायक
Edited By - Prashant Patil