esakal | पुणेकर तरुणाचे संगीत संयोजन अन् 21 देशांतील कलाकार...
sakal

बोलून बातमी शोधा

ajit kakade

प्रारंभी आठ देशातील आठ कलाकारच हा उपक्रम करणार, असे ठरले होते.

पुणेकर तरुणाचे संगीत संयोजन अन् 21 देशांतील कलाकार...

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 21 देशांतील 38 कलाकारांनी विश्वशांतीचा संगीतमय संदेश दिला. विशेष म्हणजे यात बारामतीतील युवा संगीतकार अजित काकडे यांनी संगीत संयोजनाची जबाबदारी पार पाडली. 

प्रारंभी आठ देशातील आठ कलाकारच हा उपक्रम करणार, असे ठरले होते. मात्र, उपक्रमाची व्याप्ती विचारात घेत कलाकारांची संख्या वाढत जात 21 देशांतील तब्बल 38 कलाकार यात सहभागी होणार, हे निश्‍चित झाले. यात भारतासह अमेरिका, रशिया, स्विर्त्झलॅंड, जपान, सिंगापूरसह 15 देशांतील कलाकारांनी सहभाग नोंदविला. लॉकडाउनमुळे घराबाहेर पडणे शक्‍य नाही. त्यामुळे रेकॉर्डिंगच अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्यांनाच यात संधी मिळाली. भारतातून अजित काकडे व दिल्लीचे यजंतकुमार यांना ती संधी मिळाली. 

गणित विषयाची आवड आहे, मग तुमच्यासाठी विशेष उपक्रम

हे काम एप्रिल महिना अहोरात्र सुरू होते. अनेक अडचणींवर मात करत अखेर 1 मे रोजी हा उपक्रम पूर्णत्वास गेला. तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करून एखादी सुंदर कलाकृती कशी साकारू शकते, हे जगभरातील युवा संगीतकारांनी या कृतीच्या माध्यमातून दाखवून दिले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून एक नवनिर्मिती या निमित्ताने साकारली. 

बारामतीहून पुण्याला जाणं होणार अधिक वेगवान

याबाबत अजित काकडे यांनी सांगितले की, सिंगापूरस्थित रिकी साकीया हिची ही मूळ संकल्पना होती. याची धून तिनेच रचली होती. "जगातील आठ देश मिळून एक संगीत उपक्रम करत आहेत, तू संगीताचे संयोजन करशील का...?' असा दिल्लीतील एका मित्राचा फोन मला आला. त्याला मी हो म्हणताच रिकी हिने धून पाठवली. अर्ध्या तासात कच्चा ट्रॅक करून तो पुन्हा मी रिकीला पाठवला. त्यानंतर संगीत संयोजनाची जबाबदारी माझ्यावरच आली. की बोर्ड आणि ड्रम वाजवले आहेत, मात्र आंतरराष्ट्रीयस्तरावर संगीत संयोजन करणे आव्हानात्मक होते. वेळेच्या अगोदर प्रत्येक काम झाल्याने माझ्या काम व शब्दालाही वेगळे वजन प्राप्त झाले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

श्री माताजी निर्मलादेवी यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने हे काम अगदी सहजरीत्या पार पडले, असा सर्व कलाकारांना विश्‍वास आहे. या कठीण परिस्थितीत नियमित ध्यानधारणा केल्याने आपल्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच, मानसिक स्थितीही सकारात्मक राहते, असा संदेश या कलाकारांनी पूर्ण जगाला या उपक्रमाच्या माध्यमातून दिला आहे. 
- अजित काकडे