amitabh bachchan
esakal
पुणे - ‘दे दे प्यार दे...’, ‘लोग कहते है, मै शराबी हू’, ‘मै हू डॉन’, ‘कभी कभी मेरे दिलमे..’, ‘देखा एक खॉब तो..’ यांसारख्या अनेक लोकप्रिय गाण्यांतून प्रेक्षकांसमोर आलेले, हिंदी चित्रपटसृष्टीवर ठसा उमटवणारे आणि या शतकातील मनोरंजनाचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे अनोख्या पद्धतीने ‘सेलिब्रेशन’ यंदा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच ११ ऑक्टोबरला ‘शहेनशहा-पडद्यावरच्या ‘अँग्री यंग मॅन’ला सांगीतिक सलाम’ या विशेष कार्यक्रमाद्वारे होणार आहे. प्रख्यात हिंदी व मराठी कलाकार हा आगळावेगळा कार्यक्रम प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत.