'सकाळ'च्या बातमीनंतर बोपोडी परिसरातील मुठा नदीतील जलपर्णी काढण्यास सुरवात

हरिश शर्मा
Monday, 20 July 2020

'सकाळ'च्या बातमीनंतर बोपोडी परिसरातील मुठा नदीतील जलपर्णी काढण्यास सुरवात केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

खडकी बाजार : बोपोडी येथील मुठा नदी संपूर्ण जलपात्र जलपर्णी ने व्यापले असून त्यामुळे  परिसरात डास व मच्छरांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते ही जलपर्णी त्वरित पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने काढण्यात यावी अशी मागणी बोपोडी येथील मनसे अध्यक्ष अंकित नाईक यांनी केली होती. सकाळमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पुणे महापालिकेने त्वरित नदीपात्रातील  जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याच कारणास्तव बोपोडी येथील नागरिकांनी व मनसे अध्यक्ष अंकित नाईक यांनी सकाळ चे आभार मानले. सोमवार (ता.13) जुलैला इ- सकाळमध्ये व गुरुवार (ता.16) जुलै सकाळच्या अंकामध्ये बातमी फोटोसह प्रसिद्ध करण्यात आली होती.

या सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचे तातडीने दखल घेऊन प्रशासनाने जलपर्णी काढण्यास सुरवात केली आहे. तातडीने दखल घेत जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आल्यामुळे आता लवकरच नदीपात्र जलपर्णी मुक्त होणार आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 इंधन दरवाढीचा वेग सुसाट, डिझेलची दरवाढ सुरूच

Edited by : Sagar Shelar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mutha river in Bopodi area begins to remove water hyacinth