Housing-Society-Election
Housing-Society-Electionsakal media

निवडणूक नियमावलीचे पालन करा; सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना आवाहन

Published on

पुणे : अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या (housing society) संचालक मंडळाची निवडणूक (board of directors election) त्या गृहनिर्माण सोसायटीनेच घ्यावी, असा निर्णय राज्य सरकारने (mva Government) यापूर्वीच घेतला आहे. परंतु ही निवडणूक घेण्यासाठी सरकारने जारी केलेल्या नियमावलीचे (government rules) पालन करणे सोसायट्यांना अनिवार्य राहणार आहे.

Housing-Society-Election
मुंबईतील लसवंत किती? BMC सोडवणार लसीकरणाच्या आकडेवारीचा गुंता

कोरोनाच्या कालावधीत गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळालाच मुदतवाढ दिली. ३१ ऑगस्टनंतर सहकार खात्याने अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या सोसायट्यांची निवडणूक घेण्याबाबत आदेश जारी केले. तसेच निवडणूक कशी घ्यावी, याबाबत नियमावलीही जारी केली. परंतु निवडणूक घेण्याच्या निर्णयानंतर मुदत संपलेल्या काही सोसायट्या नियमावलीचे पालन करीत नसल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, अडीचशेपेक्षा जास्त सभासद असलेल्या सोसायट्यांना निवडणूक ही राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणामार्फत घ्यावी लागणार आहे.

कार्यक्रमाचे टप्पे

निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशनपत्र वाटप आणि स्वीकृती, प्राप्त नामनिर्देशनपत्रांची यादी प्रसिद्ध करणे, नामनिर्देशनपत्रांची छाननी करून यादी प्रसिद्ध करणे, नामनिर्देशनपत्र माघारी घेणे, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी, विशेष साधारण सभा, निवडणूक, मतमोजणी याबाबत नियमावलीमध्ये विशिष्ट कालावधी निश्चित केला आहे.

आक्षेपांसाठी दहा दिवस

प्रारूप मतदार यादीवर १० दिवसांत आक्षेप घेता येतील. आक्षेपाच्या अंतिम दिनांकानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने लेखी निर्णय कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी निवडणूक निर्णय अधिकारी दोन दिवसांत प्रसिद्ध करतील.

अशी करा मतदार यादी

समितीचा कार्यकाल संपण्यापूर्वी ६० दिवस अगोदर मतदार यादी तयार करावी. सोसायटीच्या ‘आय’ आणि ‘जे’ रजिस्टरनुसार प्रारूप यादी तयार करावी. प्रारूप मतदार यादी संस्थेच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करून त्याची प्रत निबंधकास द्यावी. मतदार यादी इ-३ नमुन्यात असावी. त्यात सभासदाचे आडनाव, नाव, वडील किंवा पतीचे नाव, वय, लिंग आणि पत्ता समाविष्ट असावा.

अधिकाऱ्यांची नियुक्ती

निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती ही गृहनिर्माण सोसायटीकडून होणार असली तरी तो अधिकारी सहकार विभागाच्या पॅनेलमधील असावा. संस्थेचे लेखापरीक्षक, कर्मचारी, आजी-माजी समिती सदस्य यांची नियुक्ती निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करता येणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे प्रशिक्षण फेडरेशन किंवा मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेकडून होईल. सोसायटीने निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त न केल्यास सहकार निबंधकाकडून ती नियुक्ती करण्यात येईल.

गृहनिर्माण सोसायट्यांना निवडणूक घेताना नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. परंतु नियमावलीचे पालन न करता निवडणूक घेतल्यास त्याबाबत संबंधित सभासदाला सहकार न्यायालयात तक्रार करता येईल.

- एन. व्ही. आघाव, जिल्हा उपनिबंधक, पुणे शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com