"पुण्याचा निर्धार, कोविड हद्दपार'ला बळ द्या; विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांची सूचना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

"जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत विविध माध्यमांद्वारे व्यापक जनजागृती करावी. त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल

पुणे - जिल्ह्यात "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम राबविण्यात येत असून, त्याला "पुण्याचा निर्धार- कोविड हद्दपार' उपक्रमाची मदत होत आहे. तसेच कृती दलाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात वॉर्डनिहाय माहिती, शिक्षण आणि संवाद उपक्रम राबविण्यात यावेत, अशा सूचना विभागीय आयुक्‍त डॉ. सौरभ राव यांनी दिल्या. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

"पुण्याचा निर्धार- कोविड हद्दपार' कृती दलाचा विभागीय आयुक्‍त राव यांनी गुरुवारी आढावा घेतला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपायुक्‍त संजयसिंग चव्हाण, माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिनकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयुक्‍त राव म्हणाले, "जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत विविध माध्यमांद्वारे व्यापक जनजागृती करावी. त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. सोशल मीडियाचाही संदेश प्रसारणासाठी वापर केला जावा. होर्डिंग्ज, पोस्टर्स, हस्तपत्रिकांद्वारेही मास्क वापरणे, हात धुणे आणि सार्वजनिक ठिकाणी अंतर राखणे याबाबत प्रसार करावा. तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित येऊन ही मोहीम गतिमान करावी. हॉटेल, रेस्टॉरंट, बार येथे जनजागृतीसाठी स्टॅंडी, पोस्टर्स, टेबल मॅट, पेपर नॅपकीन यावर संदेश प्रसारित करावा.' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My Family My Responsibilit campaign