हडपसरमध्ये `माझे कुटुंब माझी जबाबदारी` मोहीम

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

मोहिम यशस्वी होण्यासाठी प्रशासन व नागरिक यांनी हातात हात घालून काम केल्यास आपण निश्चितपणे कोरोनावर मात करू शकू.

हडपसर (पुणे) : हडपसरमध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या भागात या रूग्णांवर उपचार करण्यासाठी आम्ही सेवाभावी संस्था व कार्पोरेट क्षेत्रातून कोविड केअर सेंटर सुरू करण्यास तयार आहोत. यासाठी महापालिका प्रशासनाने देखील आम्हाला सहकार्य करावे असे प्रतिपादन आमदार चेतन तुपे यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेचा प्रभाग क्र. २२ मध्ये शुभारंभ तुपे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, प्रभाग समिती अध्यक्षा पूजा कोद्रे, नगरसेवक वैशाली बनकर, योगेश ससाणे, मारूती तुपे, हेमलता मगर उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अतिरिक्त आयुक्त खेमणार म्हणाले, या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आरोग्याची चौकशी करण्यासाठी एक टीम जाईल. नागरिकांनी सदा सर्वदा मास्क लावावा. शिवाय बाहेरून आल्यानंतर कुटुंबाला विषाणूचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. बोलताना फेस टू फेस बोलणं टाळावा. येत्या काळात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येवू नये म्हणून सोशल डिस्टंसिंगचं पालन होणं आवश्यक आहे. तसेच ही मोहिम यशस्वी होण्यासाठी प्रशासन व नागरिक यांनी हातात हात घालून काम केल्यास आपण निश्चितपणे कोरोनावर मात करू शकू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My family my responsibility campaign in Hadapsar