पुणे - कुख्यात गुंड नीलेश घायवळ प्रकरणात शिवसेनेचे महानगरप्रमुख माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांवर आरोप केल्याने महायुतीतील वातावरण बिघडले आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या नेत्यांनी धंगेकर यांना समज दिली असली तरी धंगेकर यांनी पुण्यातील गुन्हेगारांना रोखण्यासाठी माझी लढाई सुरु राहील असे सांगत पुन्हा एकदा भाजपसह स्वपक्षीयांना आव्हान दिले आहे.