
खडकवासला : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पुणे- पानशेत रस्त्यालगत हवेली तालुक्यातील सोनापूर गावाजवळील नदीपात्रामध्ये शुक्रवारी (दि. ३०) रात्री उशिरा एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळून आला. अचानक मृतदेह दिसून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.