Pune News : वडगावमध्ये ओढ्यात मोटार पडल्याने चर्चांना उधाण
Sinhagad Road Update वडगाव बुद्रुकमध्ये ओढ्यात गाडी सापडल्याने खळबळ उडाली, मात्र स्टेरिंग लॉकमुळे झालेला अपघात असून कोणतीही संशयास्पद बाब नाही, असा निष्कर्ष पोलिसांनी दिला
सिंहगड रस्ता : वडगाव बुद्रुक परिसरात ओढ्यात पडलेली मोटार पाहून चर्चांना उधाण आले. पोलिसांनी छडा लावल्यानंतर यावर पडदा पडला. वडगाव बुद्रुक प्रयेजा सिटी भागातून ओढा वाहत जातो. गुरुवारी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान अचानक एक लाल रंगाची गाडी ओढ्यात पडली.