
पिंपरी : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे...’ असा संदेश संत तुकाराम महाराज यांनी दिला आहे. हाच वारसा जपण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘यशदा रिॲलटी’ यांनी ‘MyTree ः मैत्री’ असा वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प सोडला आहे. त्याअंतर्गत २४ ऑगस्ट २०२५ रोजी वृक्षारोपण केले जाणार आहे. त्यामध्ये सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.