
Pune University to Impose Admission Restrictions on Non-Compliant Colleges
Sakal
पुणे : पात्र असूनही राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेमार्फत (नॅक) मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या महाविद्यालयांवर प्रवेशास निर्बंध लागू करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. ‘नॅक’ मूल्यांकनाची प्रक्रिया न केल्यास शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता संबंधित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्थांमधील मंजूर असलेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशास निर्बंध लागू करण्यात येतील, असा इशारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्नता विभागाने दिला.