

Agriculture Minister Dattatray Bharane said women farmers are the backbone of agriculture while addressing the NABARD 45th Foundation Day celebration in Pune.
Sakal
पुणे : ‘‘मुख्यमंत्री माझा लाडकी बहीण योजना आणि उमेद अभियान यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण झाले आहे. राज्यातील ५० लाखांहून अधिक महिला स्वयं-सहाय्यता गटांतील सदस्यांना ५० हजार कोटींपेक्षा अधिक कर्जवाटप करून त्यांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचे काम सुरु आहे. महिला शेतकरी या शेतीचा कणा आहेत,’’ असे मत कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केले.